Tuesday, April 7, 2009

प्रसन्न

सदाफुलीचे काहीही नखरे नाहीत. कुठेही उगवते, कशाही हवेत तग धरून राहते, आणि फुलत राहते. कुणी तिचं कौतुक करत नाही, तिला ‘फुलांचा राजा’ वगैरे मोठी मोठी नावं ठेवत नाही, तिच्यावर कविता करत नाही. पण या सगळ्याचा तिला पत्ताच नसतो. मस्त फुलत राहायचं एवढंच तिला माहित. सकाळच्या कोवळ्या उन्हात चमकणारं हे एक सदाफुलीचं आनंदी फूल. उत्तम कॅमेऱ्याच्या कृपेने फोटो छान आलाय. फुल साईझमध्ये, अजून बारकावे बघायला फोटोवर क्लिक करा.




7 comments:

आळश्यांचा राजा said...

सहावीत असताना चित्रकलेची परीक्षा दिली होती. क्लासमध्ये सदाफूलीचं चित्र काढायला पहिल्यांदा शिकवलं होतं. त्याची आठवण झाली. फोटो छान आहे.

Yawning Dog said...

बरोबर आहे, काही नखरे नसतात एकदम गरिब आहे सदाफुली

फोटो मस्तच

रोहन... said...

सदाफूली ... सदैव फुललेली ... पण तिच्या एक उत्तम फूल असण्यावर मात्र नेहमी 'फूली' मारलेली ... :)

Gouri said...

रोहन, सदाफुलीचं फुलणं आपण गृहितच धरतो :)

rohinivinayak said...

Sadaphuli mazi khup aavadati aahe!!! kharach nehmi prasanna aste na! ha photo tar ekdam wow!!! asa aahe. baghun man prasanna jhale!

tumchya blog varchi sarv chhayachitre khup chhan aahet,, blog aavadala !

rohinivinayak said...

khup sunder sadaphuli aahe! mala khup aavadate sadaphuli,, nehmi prasanna aste,, blgo chhan aahe tumcha... ya adhi ek comment dili hoti pan kaay jhale kon jane, neet jaat nahiye.

Gouri said...

रोहिणी, आभार!

सदाफुली, बोगनवेल अश्या कितीही प्रतिकूल हवामानात टिकून राहणार्या आणि डोळ्यांना सुख देणार्या झाडांचं मला नेहेमी कौतुक वाटतं.

कॉमेंट मॉडरेशन ऑन असल्यामुळे तुमची पहिली प्रतिक्रिया लगेच दिसली नसावी.