Monday, December 7, 2009

पाणी...

    राजगडाच्या पायथ्याजवळचा एक ओहोळ. जवळपास ही गुरांना पाणी पाजण्याची जागा असावी असं दर्शवणारे गुरांच्या पायांचे ठसे आणि माफक प्रमाणात शेण. डिसेंबरमध्ये असवं तितकंच ... म्हणजे साधारण अर्धा ते एक फू्ट खोल आणि पंधरा - वीस फूट रुंद पाणी. तळाला थोडंफार शेवाळं असणारे गोटे. भर दुपारी बारा साडेबाराची वेळ. थोडक्यात, nothing perticular about the stream. रस्त्यावरून जातांना पाणी दिसलं, सहज पाण्यापर्यंत जाता येईल असं वाटलं, म्हणून नुसतं पाय बुडवायला तिथे थांबावं. परत बूट घालायचेत म्हणून जरा नाखुशीनेच पाण्यात जावं. पाण्यात पाय बुडवावा, आणि सुखं म्हणजे काय असतं, ते अनुभवायला मिळावं. तळपायाची शांती हळुहळू मस्तकापर्यंत जावी. मिठाची बाहुली विरघळून जावी, तसे मनातले सगळे संखार विरघळावेत, आणि अचानक सगळं काही स्पष्ट दिसायला लागावं. इतक्या घाई- गडाबडीने निघून आपल्याला खरं तर कुठेच जायचं नाहीये ... इथेच थांबलो तरी चालणार आहे हा साक्षात्कार व्हावा.





    तळपत्या सूर्याखाली असं डोकं थंड होत असतांना तीर्थक्षेत्रात स्नान करण्याच्या परंपरेमागचं लॉजिक समजायला लागतं. आग ओकणाऱ्या सूर्याखाली, धुळीने भरलेल्या वाटांवरून कोस चे कोस तुडवत येणाऱ्या पांथस्थाला गंगेच्या पाण्यात शिरतांना नेमकं काय वाटत असेल ते कळतं. गंगास्नानाने पापक्षालन होतं का नाही माहित नाही, पण वाटेवरच्या ओहोळात जरा वेळ पाय बुडवल्याने ताण-तणाव क्षालन नक्कीच होतं. शेजारचा साधासुधा ओहोळ हेरणारी नजर मात्र हवी.

12 comments:

आनंद पत्रे said...

परंपरेच्या मागचं लौजिक माहित नाही पण थंडगार पाण्यात पाय बुडवल्याने मनाला तजेला मिळतो हे खरे....
गोदावरीच्या पाण्यात असेच १-२ तास मजेत घालवले होते....ताणरहित.

Anonymous said...

तुझा ब्लॉग वाचून असच काहीस होत. मीन्स तणाव क्षालन का काय म्हणतात ते...

भानस said...

हो गं. तापलेल्या तळव्यांना गार पाण्याचा स्पर्श सुखावून जातोच. बाकी हे अगदी खरं...अनेकदा उगाच गडबड( मनात असलेली काढायचा म्हटला तर वेळ नक्कीच मिळतो ) करतो आपण आणि असे अनेक छोटे छोटे निखळ आनंदाचे क्षण दवडतो.
छान लिहीलेस.

Gouri said...

हे पोस्ट टाकून मी ब्लॉगजगतातून गायब झाले आहे - प्रतिक्रियांना काही उत्तर नाही - सॉरी.
परवापासून सुट्टी आहे माझी, त्यामुळे सद्ध्या ऑफिसच्या कामातून डोकं वर काढणं जवळपास अशक्यच वाटतंय ... सुट्टीचे चार दिवस निवांत हवे असतील तर जाण्यापूर्वी ही मगजमारी करायलाच हवी :(

@ आनंद, नदीच्या पाण्यात पाय बुडवून बसणं म्हणजे खरंच मोठं सुख असतं. या ओहोळाकडे बघून मला पहिल्यांदा वाटलं होतं की धड पाय तरी ओले होतील का एवढ्याश्या पाण्यात ... पण पायच काय - थेट मनापर्यंत पोहोचलं ते पाणी.

@ आशुराज,

thats a big compliment ... thanks!
ब्लॉगवर स्वागत. आणि तुझ्या ब्लॉगला शुभेच्छा!

@ भानस,
अगं कधीकधी आपण रोजच्या रूटीनमध्ये इतके बुडून जातो ना, की असे सुंदर क्षण कधी निसटून गेले कळतही नाही !

Sunshine said...

I don't know how to write in marathi in blogspot hence writing in English. It has been ages since i have experienced this. Tiny pleasures of life. With or without logic worth enjoying. :)

Gouri said...

BlueMist, ब्लॉगवर स्वागत!

थोडासा वेळ स्वतःसाठी काढून ह अनुभव पुन्हा घ्याच :)

देवनागरीमधून लिहिण्यासाठी तुम्ही बरहा सॉफ्टवेअर वापरू शकता. किंवा gmail / esakaal च्या पानावर देवनागरीमधून लिहिण्याची सोय असते,तिथे लिहून कॉपी- पेस्ट करू शकता.

Anonymous said...

पाणी हे मस्तच वाटत, बाथ टब, तरणतलाव, ओहोळ अहाहा ह्याच जागा आहेत जिथे डोक्यात विचार नसतात. मस्त डुंबत नाहीतर पायाचे तळवे बुडवून बसायचे. सध्याच्या पाणी टंचाईत
तुझे पाण्याचे पोस्ट थंड करून मन उल्हासित करून गेले. फोटो सुरेख.

Anonymous said...

पाणी हे मस्तच वाटत, बाथ टब, तरणतलाव, ओहोळ अहाहा ह्याच जागा आहेत जिथे डोक्यात विचार नसतात. मस्त डुंबत नाहीतर पायाचे तळवे बुडवून बसायचे. सध्याच्या पाणी टंचाईत
तुझे पाण्याचे पोस्ट थंड करून मन उल्हासित करून गेले. फोटो सुरेख.

Anonymous said...

नविन लिहा काहितरी.... :)

Anonymous said...

वेळ मिळत नाहीये का ग अजिबात? बरेच दिवस झाले. मी येते नेहमी. बघ थोडी सवड मिळाली की लिहीना... आग्रह नाही करत पण तुला मिस करते.

HAREKRISHNAJI said...

वा

Gouri said...

धन्यवाद, हरेकृष्णजी!

महेन्द्र, अनुजा, आले बरं का परत :)