‘बेपत्ता’ मालिकेतल्या फोटोंची ही पुढची इन्स्टॉलमेंट :)
इरुप्पूच्या वाटेवर
इरुप्पू धबधब्याजवळची खासियत ... ’blue flutter' फुलपाखरे
आणि हा इरुप्पू धबधबा -
कॉफीची फुलं
मडिकेरीजवळ ऍब्बे फॉल्स
दलाई लामा भारतात आश्रयाला आल्यावर तिबेटी निर्वासितांसाठी ज्या वसाहती तयार केल्या, त्यातली एक बैलकुप्पेची. बैलकुप्पेचं तिबेटी ‘गोल्डन टेंपल’
कुशालनगरच्या ‘निसर्गधाम’ शेजारची कावेरी
डुब्बरेचा एलिफंट कॅम्प ... इथे तुम्हाला हत्तींना आंघोळ घालायची संधी मिळते. हत्ती मस्त नदीच्या पाण्यात झोपलाय, आणि चार माणसं (प्रत्येकी शंभर रुपये मोजून) मोरी घासायच्या ब्रशने हत्ती घासताहेत :D
ही डुब्बारेची कावेरी ... भागमंडला असो, नंजनगुड असो, श्रीरंगपट्ट्ण असो की कुशालनगर ... कावेरी सगळीकडेच सुंदर दिसते!
तलकावेरी हे कावेरीचं उगमस्थान. तलकावेरीच्या टेकडीवरून परिसराचं विहंगम दर्शन होतं. बाराच्या उन्हात अनवाणी चारशे पायऱ्या चढाव्या लागल्या, तरीही worth it.
हे झाले कूर्गमधले काही फोटो. ऊटी, पयकारा आणि फुलांचे फोटो ब्रेक के बाद ...
20 comments:
छान आहेत सारे फोटो.
-अजय
sarv photos khupch chhan aahet! saglyat pahila photo khup aavadala!
Thanks Ajay :)
@ rohinivinayak, ब्लॉगवर स्वागत! इरुप्पूच्या वाटेवर गर्द हिरवी, दाट झाडी आहे. सगळीकडे डोळ्यांना सुखावणारा हिरवा रंग.
मस्त आहेत गं फोटो सगळे.....भरपुर भटकलीस ना......फुलंपाखरे तर फारच क्यूट आहेत....
खरच छान आहेत सगळेच फ़ोटो..
फ़ुल,फ़ुलपाखरु,झरा,तलाव,हिरवागार निसर्ग सगळ कस मस्त...
छान फोटो आहेत, भारीच मज्जा केलेली दिसतेय!!!
तन्वी, हो ग ... खूप भटकलो आम्ही ... फोटो काढण्यासरखं ही भरपूरच आहे या भागात. नवरा शिकायला होता कूर्गमध्ये, त्यामुळे त्याका कधी महाबळेश्वर किंवा माथेरानला नेलं म्हणजे हमखास ऐकवायचा ... ही वाळकी वाळकी झाडं बघायला आलोय का आपण एवढं तडफडत, आमच्या कूर्गचा निसर्ग बघा जरा म्हणून ... त्यामुळे ‘त्याचं’ कूर्ग बघायचंच होतं. आणि ती फुलपाखरं मला इतकी आवडली, की मला फोटो हवाच होता त्यांचा. सुदैवाने मिळालाही :)
@ दवबिंदू, ब्लॉगवर स्वागत. आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार!
@ आनंद, मजा तर खूपच केली. आराम, मस्त जेवण, आणि पोटभर भटकंती. कूर्ग बघितल्यानंतर २ दिवस शिल्लक होते ... मग तिथेच ठरवलं उटीला जाऊन येऊ म्हणून - म्हैसूर उटी रस्ता बंदीपूर / मुदुमलई अभयारण्यातून जातो ... त्यामुळे अजून एक बोनस मिळाला :)
last aani 2nd-last photo best...
मुर्खानंद, ब्लॉगवर स्वागत. तुझ्या ब्लॉगवरचे लिंगाण्याचे फोटो आत्ताच बघितले ... अल्टिमेट आहेत!
फोटो मस्त आहेत. एखाद्या प्रोफेशनल फोटोग्राफरचे फोटो वाटतात..
महेन्द्र, फोटोग्राफर शिकाऊ आहे, जागा प्रोफेशनल फोटोग्राफरने फोटो काढावेत अशी आहे :)
butterflies photo? kasa milala tumhala...ausom
coffichi phule!!! pahilyandach naav aikale aani photo suddhaa :)
मस्त फोटो. आठवणी जाग्या झाल्या
लक्ष्मी, कॅमेऱ्याचा झूम चालत नव्हता. पण फुलपाखरं परत परत एका ओल्या कापडावर येऊन बसत होती. मग मुंगीच्या पावलानी फुलपाखराच्या जवळ जाऊन काढले फोटो. ८-१० काढल्यावर एक मनासारखा मिळाला ... lucky :)
कॉफीच्या फुलं ... ही कॉफीच्या मळ्यातली, कॉफीच्या झाडाचीच फुलं आहेत...
हरेकृष्णजी, तुमच्याकडे कूर्गचे फोटो असतील तर तेही टाका ना ... फारच सुंदर परिसर आहे हा.
coffee chi phule paandhari asataat he kharach maahit navate.. pan coffechi fule itki shubhra baghun ugaach hasu aale.. hyavarun ekhadi mhan banu shakel ka? sonal laa vicharle paahije..
nandu0508, ब्लॉगवर स्वागत. कॉफीच्या गर्द हिरव्या काळपट पानांच्या पार्श्वभूमीवर ही पांढरी फुलं अजुनच खुलून दिसतात.त्यांच्या शुभ्रपणामुळे कुंदाच्या फुलांची आठवण येते.
कॉफीच्या गर्द हिरव्या काळपट पानांच्या पार्श्वभूमीवर ही पांढरी फुलं अजुनच खुलून दिसतात.त्यांच्या शुभ्रपणामुळे कुंदाच्या फुलांची आठवण येते.
फोटो खरंच छान आहेत. मला आवडले.
thanks Pankaj
Post a Comment