Thursday, September 30, 2010

हिरवाईचा उत्सव

गणपती संपले, पावसाळा संपत आला. सध्या बागेत स्पर्श, रूप आणि गंध अशी तिहेरी मेजवानी आहे ... परवा तर चक्क एक फुलपाखरू आलं होतं सातव्या मजल्यावरच्या आमच्या छोट्याश्या गच्चीत! 

या हिरवाईच्या उत्सवाचे थोडे फोटो.

सकाळ सोनचाफ्याच्या घमघमाटाची, दुपार सोनेरी उन्हात चमकणार्‍या पिवळ्या - केशरी एक्झोर्‍याची



संध्याकाळ जाईच्या नाजुक सुगंधाची. पावसाच्या मार्‍यामुळे जाईच्या फुलाने सोनचाफ्याच्या पानाचा आसरा घेतलाय! 


रात्र वेड लावणार्‍या रानजाईची!

गणेशवेलाची नाजुक वेलबुट्टी

राक्षसाचा ब्रह्मराक्षस झालाय ...


स्कॉलरही महास्कॉलर बनलाय


हे काय आहे सांगू शकाल? आल्याचा एक कोंब असा झालाय. माझ्या तरी माहितीप्रमाणे आल्याला फुल येत नाही. मग हे काय असावं?



दोन चवळीचे दाणे पेरली होते, त्याचा वेल...


17 comments:

~G said...

शेवटच्या फोटो मध्ये उजव्या हाताला खाली आहे ती शेवंती न ?

Anagha said...

अगं गौरी, किती मस्त!! किती छान वाटत असेल तुला गच्चीत तुझ्या बागेत बसायला? मस्त एक कॉफीचा मग आणि छानसं पुस्तक! :)

Gouri said...

~G, बरोबर, पिवळी शेवंती आहे ती. मागच्या वर्षीच्या झाडाची रोपं बनवली होती मी, ती मूळ झाडापेक्षा छान जोमदार आलीत. माझा कलमं विकत न आणता स्वतः बनवण्याचा पहिला यशस्वी प्रयोग. :)

Gouri said...

अनघा, सद्ध्या गच्चीत गेले, की ‘जगी सर्व सुखी अशी मीच आहे’ म्हणावंस वाटतं. भन्नाट वारं, आणि सगळीकडे बहरलेली झाडं. पुस्तक आणि कॉफीचा मग हातात असला म्हणजे तर स्वर्गसुख.

sharayu said...

आल्याला फुले येतात. पण बियांपासून आल्याचे रोप उगवायला काही वर्षे लागत असल्याने लागवडीसाठी कंद वापरले जातात.

Gouri said...

शरयू, ब्लॉगवर स्वागत आणि माहितीसाठी धन्यवाद. ही आल्याची कळीच आहे का?

Gouri said...

आल्याच्या फुलाविषयी गुगलून बघितल्यावर बरीच गमतीशीर माहिती मिळाली ... आल्याला क्वचित फुल येतं. 'ginger' हा इंग्रजी शब्द लॅटिन ‘Zingiber’ वरून आलाय, आणि लॅटिन ‘Zingiber’ आपल्या संस्कृत ‘शृङ्गवेर’ (हरिणाच्या शिंगासारखा आकार असणारे) वरून. http://www.floridata.com/ref/z/zing_off.cfm

अपर्णा said...

किती दिवसांनी सोनचाफा पाहिलं असं वाटतंय...मस्त आहे ग तुझी बाग...

Gouri said...

अपर्णा, सोनचाफा कुंडीमध्ये लावता येतो हे मलाही माहित नव्हतं. मोठ्या कुंडीत मस्त तरारलाय सध्या. माझ्या छोट्याश्या बागेचा राजा आहे तो :).

Anonymous said...

हे असल काही पाहील की माझे डोळे एकदम खुश होवुन जातात...पण बरयाच वेळेला मला ह्यांची नाव माहीत्त नसतात..नावासकट छायाचित्र टाकलीस..धन्स...

Gouri said...

देवेंद्र, अरे ही घरचीच मंडळी आहेत - त्यामुळे नावं माहित आहेत सगळ्यांची.

tanvi said...

सही मॅडम :)
अगं पण किती किती दिवसाने प्रकट होतीयेस.... जरा कमी कर तुझा अनियमितपणा... :)

Gouri said...

तन्वी, अगं नियमित लिहिलं तर माझा ब्लॉग कसला? ;) सध्या खूप खंड पडतोय लिहिण्यात. एकदम मान्य. पण काही मस्त प्लॅन चाललेत, त्यात वेळ जातोय बराच.

Kanchan Karai (Mogaraafulalaa) said...

मस्त बाग बहरली आहे.

Gouri said...

कांचन हो ग. वरूणराजाच्या कृपेने एकदम मस्त झालीय बाग.

Sagar Kokne said...

सुंदर...ही अशी बाग आमच्या गावीच पाहायला मिळायची...
इथे तरी शक्य होत नाही...छान उपक्रम

Gouri said...

सागर, ब्लॉगवर स्वागत. माझी बाग शहरातलीच आहे - फ्लॅटच्या गच्चीतली.