Wednesday, October 13, 2010

चाकोरी

महिन्यांमागून महिने. सकाळी नाईलाजाने उठायचं, आवरून ऑफिसला जायचं, घरी परतल्यावर उरलेलं ऑफिसचं काम, जे शनिवार-रविवारवर टाकणं शक्यच नाही तेवढंच घरातलं काम, बागेशी गप्पा, वाचन, गाणं ऐकणं असं काहीतरी थोडंफार - डोकं ताळ्यावर ठेवण्यापुरतं. एक दिवस संपला. शनिवार -रविवार एका दिवसाने जवळ आला या आनंदात झोपायचं. जगायचे दिवस म्हणजे सुट्टीचे दिवस. त्यांची वाट बघत उरलेले दिवस घालवायचे.

    काहीतरी जबरदस्त चुकतंय. माझं ऑफिसमधलं काम एवढं बोअरिंग नाही. किंबहुना अश्या ठिकाणी, अश्या प्रकारचं काम करायला मिळणं हे कित्येकांचं स्वप्न असेल. मग मला असं साचलेल्या डबक्यासारखं का वाटतंय?

    कारण या दिवसाला काही उद्देशच नाहीये. काल केलं म्हनून आज ऑफिसचं काम करायचं, असा प्रकार चाललाय. पुन्हा न मिळणार्‍या वेळाचा प्रचंड अपव्यय. पाट्या टाकणं. Its not fair to my employer, my family, myself.
   
    थोडं थांबून, या चौकटीच्या बाहेर जाऊन चित्राकडे बघायला हवंय. त्यातून कदाचित आपण किती नशीबवान आहोत याचा साक्षात्कार होईल, मिळतंय त्याची किंमत कळेल. कदाचित लपलेला उद्देश सापडेल. कामातला इंटरेस्ट सापडेल, किंवा इंटरेस्टिंग काम सापडेल.

    तर एवढं फ्रस्ट्रेशन आल्यावर मला कळलं - नेहेमीच्या कामातून ब्रेक घेणं गरजेचं असतं. कुणाला ब्रेक म्हणजे आठवडाभराची घरच्यांबरोबरची सहल पुरेल, कुणाला एखादा हिमालयातला ट्रेक पुन्हा स्वतःची ओळख करून देईल. तर मोठ्ठी सुट्टी घ्यायचा प्लॅन आहे. प्लॅन करताना मोठ्ठी वाटाणारी सुट्टी काय काय करायचंय याचं गाणित बसवताना लहान वाटायला लागलीय :) सुट्टीच्या नुसत्या कल्पनेनेच एकदम मन फुलपाखरू झालंय. मला पाच वर्षं एक काम केल्यावर अशी सुट्टी घ्यायला हवी - नव्याने विचार करायला. हे समजण्यासाठी एवढे महिने खर्च करायला लागलेत!

14 comments:

अपर्णा said...

गौरी चाकोरीतल्यांची व्यथा अगदी नेमक्या शब्दात मांडलीस बघ.....काहीवेळा सुट्ट्या कागदावरच राहतात आणि मग असं होतं...मस्तपैकी सुट्टी घेऊन आवडीचं ते कर.......आणि फ़्रेश हो.........

Gouri said...

अपर्णा, एकदम वैतागवाडी झाली होती काही दिवस. मग जाणवलं ब्रेक हवाय ते. सध्या सुट्टॆऎच्या कल्पनेनेच इतकं मस्त वाटतंय ना!

Raj said...

Been there so I know how feels.
Read an article sometime back that made me think really hard...

http://www.paulgraham.com/boss.html

Gouri said...

राज, लिंकबद्दल आभार ... पॉलचं प्रोग्रॅमरविषयीचं मत एकदम पटलं. (रच्याकने - ही पोस्ट मला fwd म्हणून आली होती!)
थोरोबाबामुळे पण सद्ध्या डोक्याला भरपूर खाद्य मिळतंय. सुट्टी संपल्यावर परत कामावर जाईन ना याबद्दल शंका आहे :D

♪♪♥ Prasik ♥♪♪.. ♪♪♥ प्रसिक ♪♪♥........ said...

कधी कधी या चौकोनाचा अगदी कंटाळा येतो आणि मग close system मधून open system मधे जावेसे वाटते

अनघा said...

गौरी, पटकन सुट्टी टाक आधी! आणि कुठे जाशील?? :)

Gouri said...

प्रसिक, ब्लॉगवर स्वागत! सुट्टीमध्ये सगळा वेळ चौकटीच्या बाहेरच घालवायचा विचार आहे. :)

Gouri said...

अनघा, टाकली सुट्टी ... आणि सुट्टीत कुठे जाणार नाहीये ते विचार :) थोडी भटकंती, विपश्यना, काही लोकांना भेटणं ... सगळी सुट्टी बुक झालीय आताच :)

अनघा said...

hehe!! मस्त...मस्त! मध्ये मध्ये पोस्टा टाक मात्र! :)

BinaryBandya™ said...

चाकोरी ..
फारच वाईट ...
थोडा track बदलणे फार महत्वाचे आहे ...

Gouri said...

अनघा, अग अजून वेळ आहे सुट्टी सुरू व्हायला.

Gouri said...

BinaryBandya, ट्रॅक बदलणार थोडातरी हे नक्की. फक्त गाडी डिरेल होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

गौरी said...

Gauri taai (tula taai manapasun mhanavasa watale :-)). Hi post juni ahe, pan tu je lihile ahes te me shabdshaha sadhya anubhavate ahe.
Shevti ek motha break ghyaycha nirnay zalay majha. pan sadhya tari pardeshat visa status tikvun thevnyasathi kartey kaam. tujhe posts
waachun khup chhan watate. tujhyashi ajun bolayla awdel mala. Tujha email Id milu shakel ka.

Gouri said...

गौरी, तुझी प्रतिक्रिया वाचून (उगाचच) मोठ्ठं झाल्यासारखं वाटलं बघ! :)
काहीतरी मार्ग सापडेल तुलाही!
मला कधीही gouri.bargi@gmail.com ला मेल कर हवी तर.