Saturday, March 3, 2012

नोस्टाल्जिया

पिकासामध्ये सेपियाचे प्रयोग ...आणि हा ब्लॅक ऍंड व्हाईट ...

फोटोमधले रंग कमी झाल्यावर तो जास्त सुंदर का दिसतो? :)

*****************************
प्रतिक्रिया वाचल्यावर लक्षात आलं ... पोस्टीच्या नावामुळे वाचणार्‍यांचा गोंधळ होतोय. हे जुने फोटो नाहीत. नव्याच फोटोंना पिकासामध्ये जुनं रूपडं दिलंय. नोस्टाल्जिया आहे तो जुन्या फोटोंच्या रूपड्याबाबतचा. आणि पहिल्या फोटोतली कॅमेरावाली आजी आणि नात मधली लाडूबाई आहे.

18 comments:

rajiv said...

खूप वर्षांची इच्छा पूर्ण झाल्याचा आनंद १ल्या फोटोत दिसतोय. !!!

Raj said...

मस्त. तू स्वत:चे फोटू पहिल्यांदाच टाकले का? :)

aativas said...

फोटोमधले रंग कमी झाल्यावर तो जास्त सुंदर का दिसतो? :)

Because it is unconventional now .. we are not used to it - so it is different!! :-)

Gouri said...

राजीवकाका, तो खूप दिवसांनी बाबाचा कॅमेरा हाताळायला मिळाल्याचा आनंद आहे. :)

Gouri said...

राज, फोटो मी काढलेला आहे - माझा नाही :)

Gouri said...

सविता, खरंय.आपल्याला रंगीत फोटोंची इतकी सवय झालीय की त्यामुळे सेपिया / ब्लॅक ऍंड व्हाईट फोटो विशेष वाटतात.
हे सगळे फोटो मूळचे रंगीतच आहेत. ते सेपियामध्ये करून बघितल्यावर मला लहानपणी बघितलेल्या फोटोंची आठवण झाली, म्हणून पोस्टचं नाव नोस्टाल्जिया. :)

अनघा said...

छान. :)
मलाही विशेषकरून असे फोटो अधिक आवडतात. ते त्या स्थळाचा, व्यक्तीचा, वा वास्तूचा मूड अधिक चांगल्या रीतीने व्यक्त करतात असं वाटतं. आणि इतर रंग उगाच विषयांतर करतात असं वाटतं. :)

Pankaj - भटकंती Unlimited said...

प्रश्न: फोटोचे रंग काढल्यावर तो सुंदर का दिसतो?
उत्तर: प्रत्येक फोटो हा काहीतरी संदेश देतो, काही ना काही भावना पाहणार्‍यापर्यंत पोचवत असतो. रंग वगळून जर योग्य पद्धतीने फोटो ब्लॅक-व्हाईट केल्यास रंगांमुळे वितरित होणारे लक्ष सरळ त्या भावनेशी निगडित राह्ते. आणि ती अधिक ठळकपणे मनावर कोरली जाते. याला आम्ही ‘व्ह्यूवर इन्व्हॉल्वमेंट’ असे म्हणतो. अर्थात हे फक्त काही फोटोंनाच लागू असते.

Gouri said...

अनघा,कसलं नेमक्या शब्दात सांगितलं आहेस - रंग विषयांतर करतात! जाहिरात क्षेत्रातली शोभतेस :)

Gouri said...

पंकज, pankajz.com वर आता फोटुग्राफीचा ऑनलाईन क्लास सुरू कर बरं!

Anonymous said...

बघ कमेंट टाकायला थांबल्याचा फायदा झाला... अनघा आणि पंकजने नेमके उत्तर दिलेय... :)

मला स्वत:लाही असेच फोटो आवडतात :)

Gouri said...

तन्वी, :)

Pankaj - भटकंती Unlimited said...

मी अशा टेक्निकल कमेंटसाठी पैसे घ्यायला हवेत.

Gouri said...

पंकज, म्ह्णून तर म्हटलं ... फोटुग्राफीची शाळा सुरू करा राव.

~G said...

OMG. Radha kiti mothi zali ahe. Masta vatla photo baghun. Comment delete kelis tari chalel. (bcos of the name)

Gouri said...

~G, no problem ... your comment does not mention who is Radha. :)

भानस said...

मस्तच गं! कृष्णधवल रंगातले फोटो मला तरी जास्ती आवडतात. खरे रंग उभरून येतात समोर. :)

Gouri said...

श्रीताई, कृष्णधवलमध्येच खरे रंग दिसतात :)
कुठे गायबली आहेस ग?