Saturday, July 14, 2012

जाईन विचारत रानफुला ...

    गेले दोन महिने मोठ्ठा ‘नेटोपवास’ झालाय. खूप लिहायचंय. पण उपास सोडायला हलक्या फुलक्या रानफुलांपासून सुरुवात करावी म्हणते आहे. :)

**********************************************
    गाडीचा चक्रधर आणि मार्गदर्शक दोघांची चुकामुक झालीय. गाडीतले बाकी सगळे आपापल्या परीने हा गुंता सोडवायचा प्रयत्न करताहेत. मला रस्ता माहित नाही, भाषा माहित नाही. वाट बघणं सोडून करण्यासारखं काहीही नाही. दोन मिनिटं गाडीत वाट बघत बसल्यावर रस्त्याच्या कडेची पिवळी फुलं खुणावायला लागतात.

    एका पिवळ्या फुलाचे फोटो काढता काढता त्या फुलांमध्ये लपलेली इतक्या वेगवेगळ्या प्रकारची रानफुलं समोर येतात ... इतकं काही आपल्या आजुबाजूला घडत असतं आणि आपल्याला त्याचा पत्ताही नसतो!


    हा त्या पहिल्या पिवळ्या फुलाचा धाकटा भाऊ असावा. मोठं झाड दीड फुट उंच आणि फूल साधारण एक इंच व्यासाचं, तर हे झाड सहा इंचाचं, फूल पाऊण सेंमीचं. फूल दिसायला सारखंच, पानं वेगळी:


ही फुलं अगदी जमिनीलगतची:


तर ही झुडुपावरची:


एखादं फूल किती नाजुक असावं? तीन ते चार मिलिमिटर व्यासाचं हे फूल, अखंड वार्‍यावर डोलणारं:




 
















    हे कासचं रमणीय पठार नाही – पावसाळ्यातही वरकरणी रुक्ष, रखरखीत वाटाणार्‍या आंध्रामधल्या एका रस्त्याच्या कडेचा रानफुलांचा गालिचा आहे हा!

या चिमुकल्या फुलांचा बनलाय तो गालिचा !
  

****************************************

    रच्याकने, मे महिन्यात ब्लॉगचा चौथा वाढदिवस झाला. पण वाढदिवस आता इतका शिळा झालाय, की तो साजरा करण्याऐवजी “मोठ्यांचे वाढदिवस साजरे नाही केले तरी चालतात” म्हणून मी ब्लॉगची समजूत घातलीय. :D
    वाढदिवस काय आपोआप होत राहतात, त्यासाठी काही करावं लागत नाही. पण मी जरासे टायपायचे कष्ट घेतल्याने आमच्या कासवाने य़ा वर्षी शंभरी ओलांडलीय. त्यामुळे मी खूष आहे !!

16 comments:

Anagha said...

अभिनंदन !! आणि उशिराने वाढदिवसाच्या शुभेच्छा ! फुलं सुंदर !!! :)

Gouri said...

धन्यू ग अनघा! :)

Sakhi said...

४थ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा .. :)
रानफुले मस्तच ... !!!

Gouri said...

भक्ती, आभार! :)

हेरंब said...

तशीही मोठी लोकं धावपळ जरा कमीच करतात त्यामुळे हल्ली सगळेच जण कमी लिहितात :))

अभिनंदन*४
शुभेच्छा*४

Gouri said...

हेरंबा, धन्यू * ४ :)

तशी माझ्या ब्लॉगला बाळपणापासूनच फार धावपळ सोसत नाही :D

Anonymous said...

गौरे अगं त्यातली अमुन्याकामून्याची आणि रावणा रावणा सीतेला सोड म्हणत टिचकीने उडवायची फुलं क्षणार्धात ओळखून गौराक्काने मला मस्त सुखद धक्का दिलाय :) ..... मला मुलांपर्यंत जो वारसा पोहोचावा असे वाटतेय तो पोह्चतोय बघ थोडा थोडा :)

ब्लॉगबाळाला आणि (आळशी) आईला शुभेच्छा आणि अभिनंदन गो :)

Suhas Diwakar Zele said...

व्वा वा.. मस्त एकदम :) :)

ब्लॉग वाढदिवसाच्या उशिराने शुभेच्छा :)

Pankaj - भटकंती Unlimited said...

हम्म... टुकटुकावायची सुरुवात का ही? बरं.

Gouri said...

तन्वी, गौराक्काने फुलं ओळखली म्हणून माझ्या वतीने तिला एक गोड गोड पापा! :)
आणि वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी धन्यू :)

Gouri said...

सुहास :)

Gouri said...

पंकज, हो. ही फक्त सुरुवात बरं! ;)

अपर्णा said...

ए हे बरंय नं गं....म्हणजे इतक्या महिन्यांनी उगवायचं आणि मग वाढदिवस म्हटलं की आम्हाला रागवायला पण नको...

आता तू आधीच अनियमितपणाचा बोर्ड टांगून बसलीयस म्हणून शुभेच्छा देऊनच ठेवते... :)

कुठे होतात याबद्दलचे अपडेट नियमितपणे मिळणार नं...वय वाढतंय...ब्लॉगबाळाचं गं...:P

Raj said...

वेलकम ब्याक. :)
सेंचुरी आणि वाढदिवसाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.

Gouri said...

अपर्णा, :)
येणार, येणार. लवकरच अपडेट्स येणार!

Gouri said...

राज, थ्यान्कू बरं का!