Wednesday, November 7, 2012

वो नीलम परी ...

तिकडे दूर अमेरिकेत वादळ येणार म्हणून आम्ही बाल्कनीची तिकिटं काढून पॉपकॉर्न घेऊन बसलो होतो, तोवर चोरपावलाने या चक्रीवादळाने कधी प्रवेश केला समजलंच नाही.

सुमारे आठ पाऊंड डायनामाईट. त्याने आमच्या शांत आखीवरेखीव दिवसाला सुरुंग लावलाय. सगळ्या सिस्टीम कोलमडून पडल्यात, प्रायॉरिटीजच्या ठिकर्‍या झाल्यात, नियोजनांना केटो मिळालाय. सद्ध्या नुसतंच हातावर हात धरून बघत बसलोय काय गोड वाताहात चाललीय ते. अजून अंदाजही घेतला नाही झालेल्या नुकसानाचा. निवांत आयुष्याचा विमा उतरवून ठेवलेला नव्हता ... आता कुठे भरपाई मागावी बरं?

***

ही आमची सरप्राईज गिफ्ट. याहून सुंदर आणि वाट बघायला लावणारी दिवाळीची भेट मला आजवर मिळाली नव्हती.

दत्तक बाळ मिळण्याला लोक ‘रेडिमेड’ का समजतात कोण जाणे ... हे ‘आयतं’ बाळ मिळण्यासाठी किती खटाटोप करावा लागतो आणि वाट बघावी लागते हे करून बघाल तर समजेल.

***
त.टी. – तुम्हाला केटो माहित नाही? के(राची)टो(पली) हे अस्त्र व्हेटोहूनही शक्तीमान असून कुठल्याही बेतावर हे अस्त्र वापराचे अनिर्बंध अधिकार परीकडे आहेत.

त.टी. २ – यापुढे इथल्या अनियमिततेला सज्जड कारण आहे याची कृपया नोंद घेण्यात यावी! :)

त.टी. ३ - सध्या मला मनीमाऊला निरखण्यातून सवड न मिळाल्यामुळे फोटो काढलेले नाहीत. तेंव्हा पाच आठवड्यांचं बाळ कसं दिसतं ते सध्यातरी गुगलबाबालाच विचारा.

22 comments:

Pankaj - भटकंती Unlimited said...

कसलं डेंजर वादळ आहे. आता फक्त फोटोचीच वाट पाहतोय मी. लवकर प्लीज !

Gouri said...

पंकज, तूच काढ बरं आता वादळाचे फोटो!

Pankaj - भटकंती Unlimited said...

कधी येऊ?
खाऊ काय मिळेल? तिथे व्हेटो-केटो चालणार नाही बरं.

Gouri said...

सध्या आईकडे आहे कोथरूडात. त्यामुळे पूर्वसूचना देऊन आल्यास खाऊ नक्की मिळेल.

Anonymous said...

फोटॊ.... फोटॊ......

Gouri said...

तन्वी, फोटो लवकरच येणार ... मी पण वाट बघते आहे :)

हेरंब said...

Ayyaa kitti ggod ;)))))

Rachyak, ati ati ati maha maha prachand abhinandan !!!

अनघा said...

कित्ती मस्त ! आम्ही लगेच हजर होणार आता ! :) :)

आनंद पत्रे said...

अभिनंदन :-) .. ब्राव्हो!!

सुहास said...

परीला भेटायला खूप उत्सुक आहे गं... खूप खूप अभिंनदन :) :)

अनिकेत वैद्य said...

अभिनंदन !!!

<<>>
ह्यासाठी हि लिंक पहा

http://abhipendharkar.blogspot.in/2010/03/blog-post_10.html

http://abhipendharkar.blogspot.in/2010/10/blog-post_06.html

रोहन चौधरी ... said...

वा... जबरी न्यूज. :) खूप अभिनंदन आणि शुभेच्छा.. :)

सिद्धार्थ said...

फोटो फोटो फोटो... तुमचे खूप खूप अभिनंदन, खूप सार्‍या शुभेच्छा आणि परीसाठी खूप खूप लाड प्यार. आत्ता वेळ कसा जाईल कळणार नाही. All The Very Best for 24x7 Duty.

Raj said...

ग्रेट न्यूज. हार्दिक अभिनंदन!!
सगळ्यांनी फोटू मागितल्यामुळे मी परत तेच टंकत नाही. :)

सचिन उथळे-पाटील said...

ताई , तुझ आणि माऊच खूप खूप अभिनंदन गं ...

भानस said...

गौराई, गोड गोड बातमी. फोटो लगेच लगेच हवा आहे.

आता परीसाठी नाजूकसाजूक विणायला घेतेच.... :)

तुझ्या वादळामुळे आज हम बहुत खूश है!

अभिनंदन आई-बाबाचे !

Anonymous said...

अभिनंदन...अभिनंदन ...अभिनंदन :-)

Aniket

kirti said...

WOW! Congratulations.

अपर्णा said...

अरे वा गौरी..मस्तच सरप्राइज....
आय हाय....मला कुणाही कडे मुलगी बाळ पाहिलं की जे वाटतं तेच.....;)


तू संदेशवाचलं होतंस का? (हे टोटल अवांतर आहे...)

अभिनंदन अभिनंदन अभिनंदन !!!

aativas said...

अभिनंदन आणि परीचं स्वागत.

Ninad Kulkarni said...

अभिनंदन

Gouri said...

मंडळी, तुमच्या सगळ्या प्रतिक्रियांना सविस्तर उत्तर लिहायचंय. पण सध्या नेट नाही, वेळ नाही, बराहा नाही. अजून आठवडाभर हीच परिस्थिती आहे. तेंव्हा समजून घ्याल.