Thursday, February 25, 2016

Why I have no political future ...

मी जेएनयूमध्ये शिकले आहे, आणि तिथलं स्वातंत्र्य मनापासून एन्जॉय केलेलं आहे. विशेषतः “खरं सांग, तो तुझा आतेभाऊच होता कशावरून?” अशी उलटतपासणी घेणार्‍या, रात्री आठ वाजता कुलूप लागणार्‍या “भाऊच्या शाळेतल्या” होस्टेलच्या कहाण्या ऐकून तिथे गेल्यावर तर इथे आपल्याला ग्रोन अप म्हणून वागवताहेत आणि वाट्टेल त्या चुका करण्याचं स्वातंत्र्य आहे हा फार सुखद अनुभव होता. रॅगिंग आहे, ड्रग्जचा अड्डा आहे, सेफ नाही असं काहीही मी जेएनयूला जाण्यापूर्वी ऐकून होते. पण दिल्लीसारख्या शहरात एकट्या मुलीने राहण्यासाठी जेएनयू कॅम्पसइतकी सुरक्षित जागा नसेल. And the best part was, you did not have to confirm! तुम्हाला वाटेल ते करा, तुम्हाला रोखणारं कुणीही नाही. The diversity is beautiful. इतकं सुंदर वातावरण मला दुसर्‍या कुठल्याच शैक्षणिक संस्थेत बघायला मिळालं नाही.
तिथे शिकत असताना चुकूनही विद्यार्थी संघटनांच्या वाटेला गेले नव्हते. एक तर राजकारण हे आपलं क्षेत्र नाही असं तेंव्हाही माझं ठाम म्हणणं होतं, आणि दुसरं म्हणजे आजूबाजूला दिसणारी एकही विद्यार्थी संघटना मला जवळची वाटली नव्हती. घोषणाबाजीची ऍलर्जी होतीच. सगळ्या संघटनांची सगळी पत्रकं मात्र आवर्जून वाचायचे, गंगा लॉनवरच्या डिबेट्स बघायचे. आणि हे आपलं क्षेत्र नाही, यातलं कुणीही आपल्या जवळचं नाही हे प्रत्येक वेळी अजून प्रकर्षाने वाटायचं.
आजवर तसे डाव्यांपेक्षा मला उजवेच (त्यातल्यात्यात) जवळचे वाटत आले आहेत. उजव्यांच्या विचारच न करण्याच्या परंपरेपेक्षा डाव्यांच्या ढोंगाचा जास्त तिटकारा वाटत आला आहे. २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेत आले तेंव्हा या सरकारकडून बर्‍याच अपेक्षा होत्या, आणि एका माणसाच्या हातात एवढी सत्ता, त्याला कुणीच शहाणा आणि तुल्यबळ विरोधक नाही हे बघून भीतीही वाटत होती. या सरकारला मला "ढोंगी डाव्यांच्या" बाजूचं करण्यात यश आलंय!
विद्यार्थी नेते फार शहाणे असतात असं मुळीच नाही. त्यांचे बोलविते धनी विद्यापीठाबाहेरच असतात, हे बाकी विद्यार्थ्यांनाही माहित असतं. दहा – बारा विद्यार्थी देशविरोधी घोषणा देत असतील तर त्या ऐकायला जेएनयूतले बाकी विद्यार्थीसुद्धा फिरकले नसते. फार तर कुणीतरी तक्रार केल्यावर विद्यापीठाने या विद्यार्थ्यांवर कारवाई केली असती. मुलांचं हे वागणं समर्थन करण्यासारखं नक्कीच नाही, पण केंद्र सरकारने जातीने लक्ष घालून विद्यार्थी नेत्यांवर कारवाई करावी एवढं मोठं होतं का हे? Sedition म्हणण्याइतकं? काश्मीरमध्ये पीडीपीबरोबर युती चालते आणि इथे एकदम sedition! Don’t we have any real issues to deal with?
त्यानंतर चाललेली समर्थकांची चिखलफेक दोन्ही पक्षांची पातळी दाखवतेय. जेएनयू मध्ये अमूक इतकी कंडोम्स वापरली गेली यावर मोदीसमर्थकांनी टीका करावी? This is about consenting adults. It is none of their business. देशाचे पैसे वापरून (जे एन यूमधलं शिक्षण भरपूर subsidized आहे, म्हणूनच कितीतरी हुशार विद्यार्थी तिथे शिकू शकतात.) इथेले सगळे विद्यार्थी देशद्रोही कारवाया करत आहेत, हे विद्यापीठ बंद करा म्हणायचं? का विरोधकांनी देशात हिटलरशाही आली म्हणायचं? सद्ध्या जे काही चाललंय हे आणिबाणीपेक्षा वाईट आहे? Have we lost all sense of proportion?

4 comments:

अपर्णा said...

गौरी अतिशय संयत पोस्ट. मी या सगळ्या बातम्या आतातरी दुरून वाचते आहे म्हणून गेले काही महिने माझाच देश मला परका वाटतो आहे का?, याचा विचार करताना असं वाटलं की याच बातम्या तिथे असून वाचल्या असत्या तरी ही परकेपणाची भावना आली असती हे जास्त वाईट आहे. :(
>> It is none of their business.
हा जो काही विचार आहे तो इतरही कितीतरी बाबतीत वागणुकीत आणला तरी आपण पुढे जाऊ असं वाटतं. सरकारबद्दल म्हणशील तर मे२०१४ मध्ये जी आशा होती ती आत्ता आहे असं ठामपणे सांगता येणार नाही.

Gouri said...

अपर्णा, इतके दिवस मी यावर लिहायचं टाळतेय. आता राहवे ना! :)

Unknown said...

PDP आणि BJP यांची काश्मिर मधे युती आणि sedition यांचा यंबंध कळला नाही.
बाकी लिहिलं आहे छान

Gouri said...

राजीव फडके, ब्लॉगवर स्वागत!
भाजपासाठी घटनेचं ३७०वे कलम हा कळीचा मुद्दा राहिलेला आहे, काश्मीरात लष्कराला विशेष अधिकार देणार्‍या AFSPAचं भाजपा समर्थन करत आली आहे. तर पीडीपीच्या दृष्टीने ३७०वे कलम राहिलंच पाहिजे, AFSPA जायला हवा, आणि काश्मीरला अजून स्वायत्तता हवी. हुरियत किंवा एकूणच फुटिरतावाद्यांविषयी पीडीपीला सहानुभूती. काश्मीरमध्ये पीडीपीबरोबर युती करताना भाजपा या सगळ्याकडे काणाडोळा करायला तयार आहे. यातून देशाच्या सुरक्षिततेला पोहोचू शकणारा धोका जास्त असूनही. असं म्हणायचंय त्या वाक्यात मला.