Friday, February 20, 2009

पौडाचा म्हातारा शेकोटीला आला...

माझ्या आनंदासाठी मी काहीतरी करते
दुसऱ्या कुणाच्या तरी आनंदासाठी मी काहीतरी करते
काहीतरी केल्यामुळे कुणालातरी होणाऱ्या आनंदामुळे मला छान वाटतं म्हणून मी ते करते
काहीतरी केल्यामुळे मला होणारा आनंद बघून कुणाला तरी छान वाटतं म्हणून मी त्या माणसाला ते करू देते
काहीतरी केल्यामुळे मला होणारा आनंद बघून कुणाला तरी छान वाटतं ते मला आवडतं म्हणून मी त्या माणसाला ते करू देते
काहीतरी केल्यामुळे कुणाला तरी होणारा आनंद बघून कुणाला तरी छान वाटलेलं मला आवडतं ते त्या माणसाला चांगलं वाटतं म्हणून मी ते करते

थोडक्यात, जगात जे जे काही चांगलं आहे, ते मी केलेलं तरी आहे, किंवा मी दुसऱ्याला करू दिलेलं आहे!!!
:D :D :D :D :D :D

6 comments:

Sachin Jadhav said...

he mala aavadale. yaacha tula anand hoilch. tehi mala avadel!

आळश्यांचा राजा said...

हे पौडाचा म्हातारा म्हणजे काय प्रकरण आहे? काय संदर्भ आहे?

Gouri said...

पौडाचा म्हातारा शेकोटीला आला
पौडाचा म्हातारा, म्हाताऱ्याची बायको शेकोटीला आली
पौडाचा म्हातारा, म्हाताऱ्याची बायको, बायकोचा पोरगा शेकोटीला आला
पौडाचा म्हातारा, म्हाताऱ्याची बायको, बायकोचा पोरगा, पोराचा घोडा शेकोटीला आला
पौडाचा म्हातारा, म्हाताऱ्याची बायको, बायकोचा पोरगा, पोराचा घोडा, घोड्याचं शिंगरू शेकोटीला आलं
पौडाचा म्हातारा, म्हाताऱ्याची बायको, बायकोचा पोरगा, पोराचा घोडा, घोड्याचं शिंगरू, शिंगराची शेपटी शेकोटीला आली
पौडाचा म्हातारा, म्हाताऱ्याची बायको, बायकोचा पोरगा, पोराचा घोडा, घोड्याचं शिंगरू, शिंगराची शेपटी, शेपटीचा केस शेकोटीला आला
पौडाचा म्हातारा, म्हाताऱ्याची बायको, बायकोचा पोरगा, पोराचा घोडा, घोड्याचं शिंगरू, शिंगराची शेपटी, शेपटीचा केस, केसावरची माशी शेकोटीला आली

असं गाणं आहे. अर्थात पुण्यात तो पौडाचा म्हातारा असतो. दुसऱ्या गावात ’साताऱ्याचा म्हातारा’म्हणतात असं मी ऐकलं आहे.

आळश्यांचा राजा said...

मस्त आहे. माहीत नव्हतं. शीर्षक छान दिलं आहेस.

Rohit Pathak said...

१ नंबर

Gouri said...

रोहित, एकदम जुन्या पोस्टवर प्रतिक्रिया आलेली बघून छान वाटलं! मी विसरूनच गेले होते हे. :)