जूनमध्ये जांभळ्या अबोलीचं एक रोप आणलं. आणल्यापासून ही अबोली गप्प गप्पच होती. आमच्या गच्चीतला वारा सहन झाला नाही का हिला? का ऊन कमी पडतंय? नवं घर काही तिच्या पसंतीला उतरलेलं दिसत नव्हतं. दोन आठवडे झाले तरी अबोली काही हसली नव्हती. उदास उदास, एकटी वाटत होती. अबोलीच्या कुंडीशेजारी मोगरा ठेवला. मोगऱ्याने मायेने अबोलीच्या खांद्यावर हात ठेवला, आणि हळुहळू अबोली हसायला लागली. पावसात छान तरारून वाढली, आणि या आठवड्यात तर अबोलीचा उत्सव चालला आहे ... जांभळ्या फुलांनी झाड डवरलं आहे ...
झाडांनाही अनोळखी जागी पहिल्यांदा बुजायला होतं का? कुणाची तरी सोबत, मैत्री हवीशी वाटते का? माणसांसारखीच झाडंही मनमोकळी, संकोची, बडबडी, खट्याळ अशी वेगवेगळ्या स्वभावाची असतात का?
23 comments:
अगदी खरंय...झाडांना पण कळतं असं मलाही वाटतं...इथे आल्यावर खूप संगोपन करुन लावलेली गुलाब इ. झाडे या वर्षी जास्त लक्ष द्यायला मिळालं नाही म्हणून जरा खट्टु वाटताहेत....
सुरेख
अपर्णा, अगं नुसतं पाणी कुणी घातलं याने सुद्धा फरक पडतो त्यांना बहुतेक!
गौरी, अगं किती गोड आहे गं ही जांभळी अबोली.:) माझ्याकडेही गेली आठ वर्षे प्रेमाने वाढवलेली बरीच झाडे आहेत. मी मायदेशात गेले ना की नवरा नेहमी म्हणतो, अगं माझ्यासाठी नको पण तुझ्या या झाडांसाठी तरी ये आता लवकर. मी पाणी घालतो तरी कोमेजलेलीच असतात.:)
सुंदर लिहिलंस गौरी! खरंच झाडांनाही सगळं कळत असावं! त्यांनाही भावना असाव्यात, असा माझाही अनुभव आहे. माझ्याकडेही नुकतीच अबोली फुललीय अबोली रंगाची. माहेरच्या अंगणातलं रोप आणलं होतं. तिच्यासोबत निळी गोकर्णही आणली होती. ती पण मस्त फुललीय. .
जांभळी अबोली पहिल्यांदाच पाहिली गं!!!मस्त मस्त आहे....आणि झाडाला समजते ग भाषा माणसांची, माझी आई नेहेमी म्हणते झाडं, प्राणी आणि लहान मुलं यांना बरोबर समजते आपल्याला कोण खरा जीव लावतय......
हरेकृष्णजी, ब्लॉग फॉलो करण्याबद्दल धन्यवाद! तुमच्या ब्लॉगवर दिलेली ब्लॉगची यादी म्हणजे मराठी ब्लॉग जगताचं who's who झालंय :)
सहजच, भानस, मी सुद्धा पहिल्यांदाच बघते आहे जांभळ्या अबोलीची फुलं ... इतका सुंदर रंग असतो त्यांचा हे माहितच नव्हतं.
क्रांती, अगं माहेरची अबोली म्हटल्यावर अजूनच छान फुललेली असणार ती :)
mast ahe abolicha rang. hiravi abolisuddha sundar disate ekdam pista green color aasato. :)
मीनाक्षी, हिरवी अबोली नाही बघितली मी कधी. फोटो टाक ना असेल तुझ्याकडे तर.
दुर्गा भागवतांचं 'भावमुद्रा' वाचलं का?
अब्द, ‘भावमुद्रा’ नाही वाचलेलं. वाचेन.
तुझ्या मागच्या प्रतिक्रियेवरून श्रीनिवास कुलकर्णींचं ‘डोह’मिळवून वाचलं नुकतंच.
hey....tuza pan blog ahe!!! sahi :)
wachun kadhen ata sagala...
snehal, blog var swagat!
अबोली जेंव्हा बोलते, भरभरून बोलते, डवरून बहरते. तशीच सदाफुली कुठल्याही वातावरणात टकमका पाहते. अबोलीचे बहरणे पाहून आपणही जमवून घेतो, सदाफुली सारखे आत्मविश्वास मिळवतो. हेच निसर्ग अनुभवणे आहे. सुरेख!
अनुजा, अगं तुझी प्रतिक्रिया म्हणजे छान कविताच झालीये. सदाफुली मलाही एकदा भेटली होती ... इथे आहे ती एका जुन्या पोस्टमध्ये. प्रतिक्रियेमध्ये लिंक दिलेली चालत नाहीये ... एप्रिलमधली ‘प्रसन्न’नावाची पोस्ट बघ.
लिहलंस तर मस्तच!मला आनंद याच होतोय कि आता तुझ्या रिकाम्या बाल्कनीत जांभळी अबोली हवा खाता येणार!
सुलभा, ब्लॉगवर स्वागत. अगं आता बाल्कनी पूर्वीइतकी मोकळी नाही राहिली.बरेच सगेसोयरे गोळा झाले आहेत तिथे. त्यामुळे तुला हवा खायला कंपनी मिळेल. :)
Punyaat asaal tar, 'Akshardhara'che pradarshan, Atre sabhagruha, yethe 'भावमुद्रा' miloo shakel.
पुण्यातच आहे. अक्षरधारामध्ये बघते.
nyc nyc... keep writing...
thanks, paps sapa
Kiti Sundar aani Halaw jhalay g he post!
Jhadanna bhawna astaat yat shankach naahi. yawar khup prayog suddha jhalet. Jhadanshi roj gappa maarlya tyahi premane tar ti chaan dawarun yetaat as tya prayogat siddha jhalay. tyanna Indian classical music suddha aikwaw. tyanehi farak padato as waachlay!
सोनल, अगं मी घरी गाणं ऐकत असेन, तर झाडांनाही ऐकवते :)
Post a Comment