इथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.
Wednesday, January 20, 2010
येणार ... येणार ...(वरतीमागून घोडं)
एव्हाना ब्लॉगर्स मेळाव्याचे वृत्त, छायाचित्र सगळ्या सहभागी ब्लॉगर्सनी टाकली आहेत. तेंव्हा ही पोस्ट पेठे काका आणि सर्व संयोजकांचे आभार मानण्यासाठी. मुख्य म्हणजे एक दिवसाचा मेळावा यशस्वी झाला अशी घोषणा करून आपले संयोजक स्वस्थ बसलेले नाहीत. मेळाव्यात ठरल्याप्रमाणे मराठी ब्लॉगर्ससाठी फोरम तयार करणे, नवीन ब्लॉग मराठीतून सुरू करण्यासाठी मार्गदर्शन यासाठी त्यांनी काम सुरू केलं आहे. या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. मला करता येण्यासारखी काही मदत असेल तर नक्की सांगा रे.
Labels:
प्रासंगिक
Subscribe to:
Post Comments (Atom)
14 comments:
मेळावा चुकला... भेट चुकली आणि वडया सुद्धा चुकल्या.. हेहे .. पुढच्या वेळी नक्की येणार.. :)
रोहन, पुढच्या मेळाव्यात भेटूच!!! फक्त पुढच्या मेळाव्यात तुला तिळवड्या मिळणार नाहीत :)
गौरी, रोहन सारखेच म्हणते....पुढल्या वेळी योग साधायलाच हवा.:)
तुमची सगळ्यांची आठवण निघाली मेळाव्यामध्ये.आता भारतात येशील तेंव्हा नक्की भेटू.
पुढल्या मेळाव्याचा मेनु काय आहे?? :D
मी नक्की येईन पुढल्या वेळेस.. ( मेनु वर अवलंबून नाही बरं कां!)
पुढच्या वेळी मेळाव्याबरोबरच ‘ब्लॉगर्स लंच’ आयोजित करावं अशी हरेकृष्णजींची सुचना आहे :)
अरे वा ... 'लंच'चा प्लान होणार असेल तर काय काय मेनू हवा त्यासाठी एक 'पोल' हवा ... हेहे
माझी लिस्ट तयार आहे ... :D
संयोजक कुठे आहेत बरं :)
हा..हा..पुढच्या वेळेस ’पॉटलक लंच’ आयोजित करु :)
आनंद, मेळाव्यात पोटाचाही विचार करायला हवा असा ठराव मांडावा आपण :D
पुढच्या वेळी तिळवड्या नसतील पण दुसरं काहीतरी नक्कीच असेल..सगळ्यांनी TTMM करायचं असेल तर लंच मिटिंग करायला हरकत नाही..वर जास्त लोक म्हणून हॉटेलवाले discount पण देतील ना....हरेकृष्णाजींकडे असेल चांगल्या हॉटेलची नावं...
missed meeting n your tilwadi...:)
अपर्णा, पुढच्या मेळाव्याला नक्की :)
छान लिहिलंय.
Yogesh, ब्लॉगवर स्वागत, आणि प्रतिक्रियेसाठी धन्यवाद!
Post a Comment