Thursday, January 21, 2010

अजून थोडे फोटो ... ३ (शेवटाचा भाग)

कूर्ग आणि उटीच्या भटकंतीमध्ये भेटलेली ही काही फुलं -
नुकत्याच पडलेल्या पावसाचा थेंब ... रस्त्याच्या कडेच्या रानफुलावर


कूर्गमधली जांभळी कोरांटी


कूर्गमध्ये आम्ही ज्या होम स्टे मध्ये राहात होतो, तिथलं, सकाळच्या उन्हातलं कुठल्यातरी फळभाजीच्या वेलाचं (मला ओळखता येत नाहीये) हे फूल


उटीच्या बोटॅनिकल गार्डनमधले २ फोटो ...





आम्ही उटीचं रोझ गार्डनही बघितलं ... पण रोझ गार्डनचं तिकिट आमच्या उत्साही ड्रायव्हरने काढून आणलं - प्रवेश करताना समजलं की त्याने आणि कॅमेऱ्याचं तिकिट काढलंच नव्हतं. तिकिट नाही म्हटल्यावर नवऱ्याने आत गेल्यावर कॅमेऱ्याला हात लावू दिला नाही. आत फोटो काढायचे म्हटलं तर दिवस पुरला नसता.

26 comments:

आनंद पत्रे said...

अप्रतिम रंगाची उधळन!!

रोहन... said...

कसले मस्त रंग आहेत ... बघुनच फ्रेश वाटते ... :) मी लडाखला गेलो होतो तेंव्हा अशीच खुप सारी फुले पहिली होती... इकडे फोटो बघ .. मस्त मस्त आहेत एक-एक ..

फुलांनी बहरलेले लडाख - http://www.orkut.com/Main#Album?uid=11007504890608698187&aid=1254970291

Gouri said...

आनंद, रोहन, कितीही फुलांचे फॊटो काढले, तरी प्रत्येक नवं फूल पुन्हा मोहात पाडतं. :)

davbindu said...

खरच सुंदर फ़ुल आहेत...तुमच्या ड्रायव्हरने कॅमेरयाच टिकट काढलेल असत तर मला वाटते अजुन बरीच ट्रीट मिळाली असती आमच्या डोळ्यांना...

अपर्णा said...

छानच आहेत तिन्ही भागांतले फ़ोटो..उटीला आई-बाबांना घेऊन गेले होते (लग्नाआधी) त्या ट्रिपची आठवण आली...

~G said...

ahaa! ekdum fresh vatla sakali sakali itke surekh foto baghun! :)

Gouri said...

दवबिंदु, पुढच्या भेटीमध्ये रोझ गार्डनचे फोटो :)

अपर्णा, मी पहिल्यांदाच गेले उटीला. फार व्यापारीकरण झालं आहे, महाग आहे, तितकं काही खास नाही असंच जास्त ऐकलं होतं उटीविषयी. पण मुदुमलई, निलगिरी आणि बोटॅनिकल गार्डन साठी उटीला पर्याय नाही असं वाटलं जाऊन आल्यावर.

thanks, G :)

Pankaj - भटकंती Unlimited said...

किलर आहेत सगळे फोटो. शेवटचा विशेष आवडला.

Gouri said...

Pankaj, chala mhanaje photographer kadoon certificate milale :)

Anonymous said...

कुठला आहे कॅमेरा? खुप सुंदर आले आहेत फोटो. त्यातल्या त्यात तो दवबिंदुचा!!

Gouri said...

भावाचा Sony DSC-H1... तो मी इतका वापरला आहे, की नवा कॅमेरा घेतल्यावर त्याने हा मला देऊन टाकला :)
त्याचं झूम बंद पडलंय आणि दुरुस्त होत नाहीये ...

Pankaj - भटकंती Unlimited said...

"झूम बंद पडलंय आणि दुरुस्त होत नाहीये ..."

नवीन घे. DSLR उत्तम. मी त्यासाठी अनिकेतच्या मागे लागलोच आहे. रोज त्याला छळतो. आणि आता त्याच्यावर पण "भूत सवार" केलंय. next target: गौराई :-D

Gouri said...

अरे हा प्रेमाचा आहे फार. तो टाकून नवीन घेणं म्हणजे बेईमानी झाली त्याच्याशी ... अशी प्रतारणा कशी बरं चालेल :)

अपर्णा said...

पंकज तू सध्या सगळ्यांना DSLR घेऊन देत असशील तर माझं पण नाव टाक नं त्याच्यावर जरा...लिस्टमध्ये तिसरी नं मग मी??? ही ही....

Gouri said...

हे हे .. अपर्णा, अगं त्याला दुसऱ्या टार्गेटवर अजून खूपच मेहनत घ्यायला लागणार आहे :)

Pankaj - भटकंती Unlimited said...

हा हा हा...
या विषयात मला चांगली गती आहे. मला आजवर बराच दांडगा अनुभव आहे. लग्न होऊन विकेट उडालेल्या दोन मित्रांच्या घरच्या वहिनीपण मॅनेज केल्यात. शिवाय पुढचे टार्गेट येत्या शनिवारी (दि. ६ फेब्रुवारी २०१० रोजी) पुण्यात ऍचिव्ह करतोय. आपल्यातलाच एक "साहित्यिक" बकरा DSLRसाठी हलाल होत आहे. त्यानंतरचे टार्गेट रोहन आहे.

Pankaj - भटकंती Unlimited said...

कबूल केल्याप्रमाणे टार्गेट ऍचिव्ह झाले बरं का... मिशन अकंप्लिश्ड. सविस्तर वृत्तांत माझ्या ब्लॉगवर.

Gouri said...

आता पुढचा बकरा रोहन ना? :)

Pankaj - भटकंती Unlimited said...

नाही. गौरी आणि रोहन :-D

Gouri said...

अरे मी कालच नवीन मोबाईल हॅंडसेट घेतलाय... या उधळेपणाबद्दल अजून किमान काही आठवडे टोमणे ऐकायचे आहेत आहे ... त्यामुळे डीएसएलआरचा प्लॅन अजून पुढे :(

Anonymous said...

गौरी हे कारण होई शकत नाही, मोबाईल आपल्या जागी आणि DSLR आपल्या
घेऊन टाक एक, मग आपण नविन टिम बनवु ब्लॉगींग कडुन फोटोग्राफीकडे मायग्रेट झालेले मज्जा येईल :-)

अनिकेत

Gouri said...

अनिकेत, मोबाईल आणि कॅमेरा दोन्ही आपापल्या जागी ... नवऱ्याला पटायला हवं ना पण :)

Anonymous said...

अरेच्या ही पोस्ट कशी काय राहिली पहायची???

असो..कसले सुंदर फोटो आहेत गं....

आणि माझा नवरा म्हणतोय तुला DSLR गिफ्ट देतो म्हणून.....आता वाटतय ऐकावे त्याचे....

Pankaj - भटकंती Unlimited said...

कोण कुणाला DSLR गिफ्ट देतोय? :-D

Gouri said...

तन्वी, भेटलंच पाहिजे आता तुझ्या नवऱ्याला :)

Gouri said...

पंकज, बघ तन्वीला आणि तिच्या नवऱ्यालाही पटलं सद्ध्या मला DSLR घेणं शक्य नाहीते ते ;)