Saturday, March 17, 2012

Zen Habits


काल कुठून तरी या ब्लॉगवर जाऊन पोहोचले. जगातल्या सगाळ्यात लोकप्रिय ब्लॉगपैकी हा एक आहे, मान्य. पण मला याच शोध काल लागला. आणि शोध लागल्यापासून मी आधाश्यासारखी इथल्या पोस्ट वाचतेच आहे.
**************
नोकरी लागल्यावर वर्षभरात मी केस पुन्हा कापण्याच्या निर्णयाला येऊन पोहोचले होते. लहान केस आवडतात म्हणून नाही, तर मोठे केस मेंटेन करायला वेळ मिळत नाही म्हणून. बदलणारे प्राधान्यक्रम, कित्येक गोष्टी ‘सोडून देण्या’चा निर्णय, या सगळ्याचं हे एक उदाहरण होतं. केस मेंटेन करता आले नाहीत तर फार काही बिघडत नाही, कापून टाकता येतात. जगण्यातल्या कित्येक गोष्टी अश्या ‘कापून टाकण्याचे’ निर्णय आपण घेत असतो, ते आवश्यकच असतं. कळीचा मुद्दा हा आहे, की या गोष्टी काढून टाकून आपण कश्यासाठी जागा करतो आहोत? ज्यासाठी जागा केली, ती खरंच प्रायॉरिटी आहे का? नाही्तर ट्रेकला जाताना सॅकमध्ये जागा नाही म्हणून पाण्याची बाटली काढून टाकून जास्तीचे कपडे भरण्यासारखं चाललंय आपलं. सॅकचं वजन कमी झालं, पण जास्त महत्त्वाची गोष्ट बाहेर राहिली.

सहा आठवड्याच्या कामातून त आपण वर्षभराची पोटापाण्याची सोय करू शकतो असं गणित थोरोने मांडलंय. ही ‘पोटापाण्याची सोय’ माझ्या आयुष्याचा फार मोठा भाग व्यापून टाकते आहे. कारण सहा आठवडे काम = एक वर्षाची सोय एवढं सोपं गणित मला मांडता येत नाही. जेंव्हा हातपाय चालणार नाहीत तेंव्हा काय करायचं? डोक्यावरचं छप्पर मला पुण्यातच, चांगल्या वस्तीत, किमान दोन बेडरूमचं लागतं. चारचाकी लागते, वीज लागते, इंटरनेट लागतं - एक ना दोन हजार गोष्टी येतात माझ्या ‘पोटापाण्याच्या सोयी’मध्ये. वर्षाला सहा आठवडेच काय, वर्षाचे सगळे आठवडे काम केलं तरी मला खात्री नसते पोटापाण्याची सोय झालीय म्हणून. आपलं आयुष्य आपण फार गुंतागुंतीचं करून ठेवलंय. हे सोपं बनवल्याखेरीज मजा नाही हे गेले काही महिने फार प्रकर्षाने जाणवतंय.

सुखाने नोकरी करायची असेल, तर घरातल्या काही गोष्टींकडे काणाडोळा करायला शिकावं लागतं. फक्त घरातल्याच नाही, मनातल्याही. घरातली आणि मनातली ही अडगळ, आपण कितीही दुर्लक्ष करायचं म्हटलं, तरी ताण तणावात भर घालत राहते. आज ना उद्या तिच्याशी दोन हात करावेच लागणार आहेत.

शिस्त लावायची म्हणून सवयी लागत नसतात. आतून ते करायची इच्छा जागी व्हायला लागते. जे आतून करावसं वाटतं ते करणं हा कळीचा मुद्दा आहे.
**************
या आणि अश्या सतराशे साठ गोष्टी. मला फक्त विचाराच्या पातळीवर जाणवताहेत. त्यावर कार्यवाही करण्याची निकड जाणवली नव्हती अजून. झेन हॅबिट्सवाला बाबा हे सगळं प्रत्यक्षात आणतोय. माझा हे करायचा मुहुर्त कधी लागणार?

16 comments:

Anonymous said...

गौरे आभार गं या ब्लॉगाच्या लिंकबद्दल.... तुझी पोस्ट तर आवडलीच आणि तिने विचारातही टाकलेय...

हा ब्लॉग मात्र बऱ्याच प्रश्नांची उत्तरही देतोय!!

जियो गौरीबाय!!

Raj said...

ग्रेट! मी लिओचा ब्लॉग बरेच दिवस वाचतो आहे. दोन वर्षांपूर्वी हा ब्लॉग टाइम च्या २५ ब्लॉगमध्ये होता. सहसा असे विषय काढले 'मराठी मानूस' चार हात लांबच असतो म्हणून मी याचा उल्लेख केला नाही. तुला इंटरेस्ट आहे हे माहीत असतं तर आधीच सांगितलं असतं. :)

मी वाल्डेनची जी आवृत्ती वाचली त्याला अपडाइकची प्रस्तावना होती. त्यात त्याने थोरोप्रमाणे जगणं आज शक्य आहे का हा मुद्दा मांडला आहे. अगदी तसं नाही करता आलं तरी गरजा कमी करता येतात हे नक्की.

बाय द वे, लिओच्या प्रेरणांमध्ये थोरोही आहे. सिंप्लिफाय, सिंप्लिफाय! :)

Gouri said...

तन्वी, या ब्लॉगविषयी मला आवडलं म्हणजे लिओ "मी काय केलं" हे सांगतो. नुसते विचार मांडत नाही.

Gouri said...

राज॰ मला लिओचा ब्लॉग माहित नव्हता. साधारणपणे मी सेल्फ हेल्पवाल्या पुस्तकांच्या वगैरे फारशी वाटेला जात नाही. त्यामुळे कधी शोधही घेतला नव्हता. पण काल अचानक सापडला.
वॉल्डन वाचून मला एक जाणवलं - थोरोच्या हिशोबात भांडवली खर्च शून्याच्या जवळपास आहे. वॉल्डनच्या काठावरची जागा त्याने ‘वापरायला घेतलीय’. त्यामुळे त्याचा हिशोब जसाच्या तसा लागू होईल असं नाही. पण या दिशेने विचार तर चाललाय.
लिओचा ‘मिनिमॅलिझम’ वाचताना थोरो आठवतोच. :)

Vijay Deshmukh said...

Great... I must read it. baghato jara.. Thanks for sharing.

If there are more books/ blogs like this, do share.

Gouri said...

विजय, ब्लॉगवर स्वागत! हा ब्लॉग खूपच उपयुक्त वाटला मला. याविषयी अजून काही इंटरेस्टिंग सापडलं, तर इथे टाकेनच.

प्रसाद हरिदास said...

Thanks yar...

Actully asa mazahi hotay.. tyacha marg sapdlyasarakha wattoy pan agdich 6 athawade nahi tari 4-5 warshachy mehnatichi tayari pahije ... :)
aghuyat kay hotay te :)

Gouri said...

प्रसाद, प्रतिक्रियेसाठी आभार! हे गणित जुळलं असेल तर अनुभव नक्की शेअर करा!

अपर्णा said...

गौरी माते तुला त्रिवार प्रणाम..मागेच म्हणून झालंय मी तुला गल्ली चुकलेस तू.....
__/\__

Gouri said...

अपर्णा, :D
अगं सद्ध्या कुठली गल्ली घेऊ तेच शोधते आहे. बघू कधी सापडते ते!

Priyaranjan Anand Marathe said...

Danke!

Gouri said...

Priyaranjan, gerne! :)

Trupti said...

Hi Gouri,
Tee Zenchi link click kelye ani te vachta vachta jya ajun link sapdat ahet tya pan!!! Interesting....u know... actually i must say i am already trying to follow most of that...n u see...just before I started reading ur blog or rather after that also I was a bit feeling like I shall also be "Like others who are running or forced to run after....nyways, thks!

Trupti said...

Hi Gouri,
Tee Zenchi link click kelye ani te vachta vachta jya ajun link sapdat ahet tya pan!!! Interesting....u know... actually i must say i am already trying to follow most of that...n u see...just before I started reading ur blog or rather after that also I was a bit feeling like I shall also be "Like others who are running or forced to run after....nyways, thks!

Trupti said...

Hi Gouri,
Tee Zenchi link click kelye ani te vachta vachta jya ajun link sapdat ahet tya pan!!! Interesting....u know... actually i must say i am already trying to follow most of that...n u see...just before I started reading ur blog or rather after that also I was a bit feeling like I shall also be "Like others who are running or forced to run after....nyways, thks!

Gouri said...

तृप्ती, मोठा खजिना आहे झेन हॅबिट्सच्या साईटवर. आणि सगळ्या प्रत्यक्ष करून बघण्याच्या गोष्टी आहेत.