ओरिसाची भटकंती: केचला
ओरिसाची भटकंती: प्रथमग्रासे ...
केचलाहून परतल्यावर कोरापुटमधल्या काही बचतगटांचं काम बघायची संधी मिळाली. इथे ‘मिशन शक्ती’ अंतर्गत स्त्रियांच्या बचतगटाची कामं जोरात चालू आहेत. मिशन शक्तीच्या कोऑर्डिनेटर सीता मॅडमबरोबर अंगणवाडीमध्ये पुरवण्यात येणारा सकस आहार (याला ओडियामध्ये ‘छतुआ’ म्हणतात) बनवणार्या बचत गटाला भेट दिली.
छतुआ बनवणार्या बचतगटाच्या बायका जेंव्हा आग्रहाने सरकारी पाहुण्यांना घरी चहाला बोलवतात, तेंव्हा त्या पाचशे लोकसंख्येच्या वस्तीमधली वीस घरं तरी नक्षलांपासून दूर राहतात. आणि मी भरलेल्या कराचा देशाच्या कुठल्यातरी कोपर्यात सुयोग्य वापर होतोय याचं मला समाधान मिळतं.
ओरिसाची भटकंती: प्रथमग्रासे ...
केचलाहून परतल्यावर कोरापुटमधल्या काही बचतगटांचं काम बघायची संधी मिळाली. इथे ‘मिशन शक्ती’ अंतर्गत स्त्रियांच्या बचतगटाची कामं जोरात चालू आहेत. मिशन शक्तीच्या कोऑर्डिनेटर सीता मॅडमबरोबर अंगणवाडीमध्ये पुरवण्यात येणारा सकस आहार (याला ओडियामध्ये ‘छतुआ’ म्हणतात) बनवणार्या बचत गटाला भेट दिली.
सरकारी योजनेचे लाभार्थी ही माझ्यासाठी आजवर एक मिथिकल टर्म होती. हे लाभार्थी खरंच असतात का, असल्यास दिसती कसे आननी हे बघायला मिळालं पहिल्यांदाच. दहा दहा बायकांचे दोन बचत गट. छतुआसाठी लागणारे गहू, डाळं, सोयाबीन असे घटक भाजायचे, गिरणीतून दळून आणायचे, ठरलेल्या वजनाची पाकिटं करायची आणि आंगणावाड्यांना पुरवायची. त्यांच्यातलीच थोडीफार शिकलेली बाई हिशोब ठेवणार. मोठाल्या कढयांमधून धान्य भाजताना हात भरून येतात, पण या महिन्याला प्रत्येकीला हजार – दोन हजाराची कमाई होईल. पुढच्या महिन्यात रोस्टर विकत घ्यायचा, म्हणजे भाजण्याचे कष्ट वाचतील. त्यानंतर मग चक्की घ्यायची ... सरकारने पुरवलेल्या काही हजारांच्या बीज भांडवलातून या बायकांना ही स्वप्न बघण्याची उमेद मिळालीय. भाषा समजत नसली, तरी त्यांच्या डोळ्यातला उत्साह नक्की समजतो. पाचशे लोकसंख्येच्या वस्तीपैकी वीस कुटुंबांना यातून उत्पन्न मिळतंय. असे बचतगट गावागावात उभे करण्यात सिंहाचा वाटा आहे सिता मॅडमचा. मिशन शक्तीचं काम ही त्यांची केवळ नोकरी नाही, त्यांचं मिशन बनलं आहे. आणि त्यांची कल्पकता, तळमळ यांचं मोल ओळखून त्यांना संपूर्ण पाठिंबा, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देणारे कलेक्टर त्यांना लाभले आहेत.
छतुआचं पॅकिंग |
ट्रायबल लाईव्हलीहूड प्रकल्पात आदिवासींना मिळालेल्या कोंबड्या
|
सरकारी नोकरी करणारी बाई. या बचतगटांच्या कामासाठीच पगार मिळतो ना तिला ... मग ती करते आहे त्यात विशेष ते काय? असा प्रश्न पडेल वरचं सगळं कौतुक वाचून. पण हे सरकारी कर्मचारी किती मोठं काम करताहेत हे समजून घ्यायला त्यांच्या भोवतालची परिस्थिती समजायला हवी. कोरापूटची तुलना महाराष्ट्राच्या गडाचिरोलीशी होऊ शकेल कदाचित. दुर्गम, राज्याच्या राजकारणात नगण्य स्थान असणारा, अविकसित, आदिवासी भाग. इथे कुपोषण आहे, सेरेब्रल मलेरिया आहे. इथे बदली होणं म्हणजे पनिशमेंट पोस्टिंग. या भागात बदली झाली, तरी कित्येक वेळा बाहेरचे लोक कार्यभार स्वीकारतच नाहीत. त्यामुळे इथे काम करणारे बाहेर कसे पडणार? त्यात नक्षलवादाचा प्रभाव. नारायणपटणामध्ये बायका बचतगटाच्या मिटिंगला गेल्या तर नक्षलवादी त्यांना दंड करतात. अश्या परिस्थितीमध्ये सिता मॅडम, त्यांच्यासारखे बाकीचे कर्मचारी, जिल्ह्याचे कलेक्टर ‘नक्षल प्रभावामुळे इथे विकासकामं शक्य नाहीत’ म्हणून हातावर हात धरून बदलीची वाट बघत बसू शकतात.
8 comments:
गौराक्का! आनंद दिलात, खूप खूप आभारी आहे.
सगळीकडे सर्व प्रकारची लोकं सापडतात, ह्याला सरकारी नोकरी पण अपवाद नाही म्हणायचं तर!
जी लोकं अशी कामं करत आहेत त्यांच्या बद्दल खूप आदर आहे.
अभिषेक, सगळीकडे असतात, तशीच सरकारी नोकरीतही अशी माणसं आहेत. त्यांच्या कामाला पाठिंबा देणारे वरिष्ठ भेटले, म्हणजे ते मनापासून काम करतात. दुर्दैवाने सिस्टीमबाहेरून बघताना आपल्या नजरेला हे लोक चटकन पडत नाहीत.
अभिषेक +१
>>>आणि मी भरलेल्या कराचा देशाच्या कुठल्यातरी कोपर्यात सुयोग्य वापर होतोय याचं मला समाधान मिळतं .... सगळी पोस्ट तर भावतेच पण हे असे एखादे वाक्य ही तुझ्या पोस्ट्सची खासियत ठरते गौरे !!!
तन्वी, :)
बरं वाटतं असं काही वाचलं की. इतक्या लांबवरच्या बातम्या इथे पोचवल्याबद्दल अनेक आभार.
राज, इतकं सुंदर काम बघायला मिळालंय ना, ते सगळं इथे शेअर करायचा प्रयत्न आहे.
I am very happy to read about Bachatgata work.Some positive work is going on.I am not a regular blog reader but now i will keep track.
Thanks a lot.
Mamata
ममता, प्रतिक्रियेसाठी आभार! असं काम खूप ठिकाणी चालू असतं, पण त्याच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत, नाही का?
Post a Comment