कूर्ग बघून झाल्यावर २ दिवस जास्तीचे ठेवले होते ... त्यामुळे उटीला जाऊन यायचं ठरलं. असं काहीही पूर्वनियोजन न करता भटकण्यामध्ये मस्त मजा असते. काहीच अपेक्षा नसताना जे काही अनुभवायला मिळतं, ते सगळं बोनस असतं ना :)
दोड्डाबेट्टा म्हणजे निलगिरी पर्वतामधलं सगळ्यात उंच शिखर. दोड्डाबेट्टाला गाडीतून जाता येतं. वरून निलगिरीचं सुंदर दृष्य दिसतं ...
हे उटीमधलं लेक:
पयकारा हे उटीजवळचं गाव. हिरव्यागार टेकड्या, सुंदर तळं, छोटासा धबधबा, पार्श्वभूमीला निलगिरीच्या रांगा अशी ही रमणीय जागा आहे. पयकाराच्या या टेकडीच्या परिसरात कित्येक बॉलिवूडपटांचं चित्रीकरण झालेलं आहे:
पयकाराजवळच्या मुदुमलई पॉईंटवरून दिसणारं हे मुदुमलईचं जंगल ...
म्हैसूरला परत जाताना जवळ तासभर वेळ होता, म्हणून वाटेत नंजनगूडचं मंदिर बघायला थांबलो. नंजनगूड देवळातला लाकडी रथ
उटीची सहल तिथल्या बोटॅनिकल गार्डनला आणि रोझ गार्डनला भेट दिल्याखेरीज पूर्ण होऊच शकत नाही. तिथली फुलं ब्रेक के बाद.
6 comments:
गौरी... मस्त आहेत फोटो. पुणे ब्लॉगर्स स्नेह मेळाव्याचे फोटो नक्की टाक.
फोटों मस्त पण बरोबर अजून वर्णन यायला हवे ...दोड्डाबेट्टा आणि मुदुमलईचं जंगल ... तिथले हत्ती. असे बरेच काही... :) वाचायला आवडेल.
@ दुनियादारी, पुणे ब्लॉगर्स स्नेह मेळाव्याला अनिकेत ‘ऑफिशियल फोटोग्राफर’ आहे,त्यामुळे आपल्याला भरपूर फोटो बघायला मिळतील :)
@ रोहन, वर्णन लिहिण्यासाठी काही दिवस निलगिरीमध्ये हरवून जायला हवं ... या ट्रीपमध्ये काही तास मिळाले फक्त त्यासाठी. पण म्हैसूरहून उटीला जाणारा रस्ता २०-२५ किमी अंतर बंदीपूर / मुदुमलईमधून जातो. त्यामुळे जातांना- येताना वाटेत हत्ती दिसले - एकांडा सुळेवाला रस्त्यापासून २५-३० फुटांवरून बघितला. फक्त मुदुमलईमध्ये भटकण्यासाठी एक सुट्टी प्लॅन करायला हवी एवढं मात्र ठरवलं या ट्रीपमध्ये.
गौरी फोटो सुंदर आहेत. आवडले. दोड्डाबेट्टा-बंदीपूर मी पाहिलेले आहे पण आता त्याला बरीच वर्षे झालीत. बरेच काही बदलले असेल.
अरे वा, तू पण जाते आहेस का ब्लॊगर्स स्नेह मेळाव्याला. सहीच गं.:)
भाग्यश्री, हो ग, खूपच बदल झालेला असणार. तू बघितलंस तेंव्हा तर अजूनच सुंदर असेल हा परिसर.
ब्लॉगर स्नेहमेळाव्याविषयी लिहिनच मी.
खूप छान जागा आहेत या. तिकडे आकाश नेहमीच असे निळे असते आणि मधेच पांढरे कापशी ढग. फोटो खूप सुंदर आहेत.
बंगळूर, मैसूर, उटी, कुन्नूर, दोडाबेट्टा खरच स्वर्ग आहे. निळेशार पर्वत आणि गुलाबी थंडी (अशा उपमा पुस्तकात वाचून माहीत आहेत तरी अजून एकटाच आहे), टॉय ट्रेन, आणि साऊथ इंडियन कॉफी अजून काय पाहिजे.
http://www.pankajz.com/2009/03/southern-trail-bangalore-mysore-ooty.html
Post a Comment