Thursday, February 10, 2011

राणीच्या बागेत

जिथे सूर जुळतात, अश्या दोस्तांबरोबर पोटभर गप्पा मारायच्या, सकाळ संध्याकाळ गरमगरम आयतं जेवण जेवायचं, मनात आलं की सिनेमे बघायचे, पुस्तकांची, गाण्यांची देवाणघेवाण करायची. मस्त पाहुणचार झोडायचा.याला निव्वळ चैन म्हणतात. अशी चैनही करायला मिळाली सुट्टीत आळश्यांच्या राजाकडे. आळश्यांच्या राजाच्या राणीने मस्त बाग फुलवलीय. हे त्या बागेतले काही आळशी क्षण.
***
जिथे वर्ष - दोन वर्षांपलिकडे कोणी राहात नाही, अशी सरकारी क्वार्टर्स साधारणपणे फार बापुडवाणी दिसतात. त्यांची डागडुजी, निगा यात कोणाला रस नसतो. अश्या क्वार्टरची बाग एवढी सुंदर फुलवणार्‍या सुलभाला दाद द्यायलाच हवी!

2 comments:

भानस said...

अहाहा!!! दिल खुश हो गया!

सुलभाची बाग देखणी फुलली आहे. आजच बाहेर इतक्या स्नो मधे घरात दोन सुंदर जास्वंदे उमललीत. :)

फोटो शेअर केल्याबद्दल धन्यू गं.

Gouri said...

एवढ्या थंडीत जास्वंद ... बघूनच ऊब येत असेल ग! फोटो टाक ना शक्य असेल तर.

माझ्या सगळ्या भटकंतीमुळे सद्ध्या बागेकडे दुर्लक्ष झालंय ... जरा रुसली आहेत झाडं.